
आज एका अनोख्या आणि श्रद्धापूर्ण सोहळ्याचे साक्षीदार होण्याचा योग आला आहे. श्री खंडोबाची मूर्ती आज मैलारपूर (नळदुर्ग) येथून अणदूरकडे प्रस्थान करीत आहे. ही घटना केवळ धार्मिक स्थलांतर नसून, दोन गावांमधील एकात्मता, भक्ती आणि परंपरेचे प्रतीक आहे.अणदूर आणि मैलारपूर (नळदुर्ग) ही दोन गावे जरी वेगवेगळी असली तरी त्यांना जोडणारा दुवा आहे तो म्हणजे श्री खंडोबा. दोन्ही गावांमध्ये श्री खंडोबाची मंदिरे आहेत, परंतु आश्चर्याची गोष्ट म्हणजे दोन्ही मंदिरांमध्ये एकच मूर्ती आहे जी वर्षभर दोन्ही गावांमध्ये विभागून ठेवली...